कन्हान येथे जगजागृति, फलक, मार्गदर्शन करुन आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा


कन्हान  येथे जगजागृति, फलक, मार्गदर्शन करुन आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात १० व १२ वी च्या शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना कन्हान पोलीस स्टेशन व्दारे अंमली पदार्थ वापरासंबंधी आळा घालण्याबाबत तसेच त्यांचे दुष्परिणामा विषयी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करून परिसरात अंमली पदार्थाचे दुष्परिणामाचे फलक लावुन जनजागृती रैली काढुन २६ जुन अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला.

सोमवार दिनांक २६ जुन ला अंमली पदार्थ विरोधी दिवस निमित्य कन्हान पोलीस स्टेशन द्वारे परिसरात खाजगी शिकवणी मित्रा कोचिंग क्लासेस गणेश नगर, मोढे कोचिंग क्लासेस शिवनगर कन्हान या दोन्ही स्थळी अंमली पदार्थ वापरा संबंधी आळा घालण्याबाबत तसेच त्यांचे होणारे दुष्परिणामा बाबत कार्यशाळा घेवुन गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक यशवंत कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खाजगी शिकवणी वर्गातील ८० मुले, मुली एकत्रित करून त्यांच्या हातात दोन फ्लॅंग देवुन कन्हान शहरातील मुख्य रस्त्यांनी जनजागृती रॅली काढुन विविध मार्गाने रॅली भ्रमण करुन पोलीस स्टेशन कन्हान येथे पोहोचली  असता पोलीस स्टेशन येथे पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ वापरा संबंधी आळा घालण्याबाबत आणि दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कन्हान परिसरातील तारसा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, सह ठिकठिकाणी दर्शनिय स्थळी बॅनर लावण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण येथुन प्राप्त झालेले बॅनर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ बंद टोल नाका येथे लावण्यात आले आहे.

तसेच पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत औषधी विक्री केंद्र चालक यांना डिन, टॅमेझोन व अल प्रायझोलम इत्यादी औषधी विक्री केंद्रात होणाऱ्या ड्रग्स ची अवैधरित्या विक्री होणार नाही  तसेच औषधी दुकानात सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्या बाबत, आणि १८ वर्षां खालील मुला-मुलींना वरील प्रकारचे औषधी विक्री करु नये असे सुचित करण्यात आले.

प्रत्येक मेडीकल पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. अश्या विविध कार्यक्रमाने कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अमली पदार्थ वापरासंबधाने आळा घालने व त्यांचे होणारे दुष्परिणामा संबंधी जनजागृती करून अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान पोलीस स्टेशन थानेदार प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम यांचा नेतृत्वात महिला, पुरूष पोलीस कर्मचारी वृंद व वाहतुक पोलीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post