जुनी पेंशन नाकारलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या व्यथा निवेदनात VOTEFOROPS मोहिमेची दिली माहिती

 








जुनी पेंशन नाकारलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या व्यथा...*

     -निवेदनात VOTEFOROPS मोहिमेची दिली माहिती.-

आर्वी :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण भारत भर 'भारतजोडो' यात्रा काढून भारतातील जनसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचं प्रयत्न केला याच धर्तीवर महाराष्ट्रातील काँग्रेस कमेटीने जनसंवाद यात्रा प्रारंभ केली आहे.
राज्य शासनाने 2005 नंतर च्या नियुक्त कर्मचाऱ्यांना अन्यायकारक NPS नामक पेन्शन योजना कार्यन्वित करून कर्मचारांवर अन्याय केलेला आहे.याचा विरोध म्हणून संपूर्ण राज्य कर्मचाऱ्यांनी V OTEFOROPS या मोहिमेचा प्रारंभ करीत आगामी निवडणुकीत जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यालाच कर्मचारी कुटुंब मतदान करेल या स्वरूपाची मोहीम आरंभिली आहे.या आशयाचे निवेदन महारष्ट्रातील सर्व आमदारांना स्थानिक जुनी पेन्शन संघटनेच्या शिलेदारांनी दिलेले आहे.काँग्रेस च्या जनसंवाद यात्रेत कर्मचाऱ्यांची दुरावस्था काय आहे आणि येणारी निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हिमाचल प्रदेश,राजस्थान या काँग्रेस शासित राज्यप्रमाणे जुनी पेन्शन च मुद्दा घ्यावा या आश्याचे निवेदन यावेळी राज्य संपर्क प्रमुख सुशील गायकवाड यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
काँग्रेस शासित राज्यामध्ये या आधी NPS योजना बंद करून जुनी पेन्शन योजना बहाल केल्या गेली त्यामुळे सर्व कर्मचारयनमध्ये एक आशावाद निर्माण झाला.महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीमध्ये ops हा मुद्दा महत्वाचं आह हे लक्षात घेऊन जो राजकीय पक्ष याचे भांडवल करण्यात यशस्वी होईल त्याचे पारडे जड राहील अशी भावना निवेदन सादर करतांना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली .यावेळी जिल्ह्द्यक्ष प्रफुल कांबळे, विमाशि जिल्हाउपाध्यक्ष धर्मपाल मानकर सर ,चंद्रशेखर शेंडे,ओम पिंपळकर,अमर गोरे,प्रीतम लोहे,मनीषा श्रावणे ,समीर खोंडे ,ललिता आसटकर,सुधीर मुडे ,डॉ.निलेश गावंडे,पालीवाल ,मढवे ,अमोल नागपुरे,तुमस्कार,खुणे,शिवाजी सावंत,दुबळे,कुंदरानी जाधव,बोबडे,खुडसंगे ,आखरे ,वानखडे जया खोंडे,आदी उपस्थित होते.
आम्हची स्पेसिअल रिपोर्ट BNA24मराठी news,वर्धा, महाराष्ट्र


Post a Comment

Previous Post Next Post