कन्हन येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न



कन्हन येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

कन्हान - जिल्हा कराटे संघ नागपुर द्वारे कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कराटे स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प माजी अध्यक्ष व सदस्य रश्मी बर्वे व उद्घाटक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे तर  एस. बी. भलावी,   दीनानाथ वाघमारे , विशाखा ठमके , सूर्यभान फरकाडे प्रामुख्याने उपस्थित होते 


जिल्हा कराटे संघ नागपुरद्वारे आयोजित कराटे स्पर्धेत नागपुर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेतला असून ह्या स्पर्धेत विजयी कराटेपटु राज्य कराटे स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती नागपुर जिल्हा कराटे संघाचे अध्यक्ष संजय इंगोले यांनी दिली . 

स्पर्धेत विविध वयोगटात व वजनगटात काता व कुमिते मध्ये कराटेपटुनी उत्तम कामगिरी केली असून विजयी खेळालू यांचे मान्यवरानी पदक , सम्मानचिन्ह देवून सत्कार केले . स्पर्धेचे कामकाज कराटे संघाचे शब्बीर शाह,  राजेश लारोकर, रविकांत मेश्राम, मनीष येवले, नागपुर जिल्हा कराटे संघ रेफरी काउंसिल चेयरमैन दीपचंद शेंडे व जगदीश पाटिल , रिदम शेंडे , विश्वजित गायकवाड़ यानी पाहिले 

यावेळी शरद डोनेकर , रोहित बर्वे, पुरुषोत्तम मस्के, परमानन्द शेंडे, निखिल पाटिल , मनीष भिवगड़े , राजेश यादव , सतीश घारड , जयवंत गटपाडे , अजय चौहान प्रामुख्यात उपस्थित होते 

कार्यक्रम सफलार्थ आनंद शेंडे , शिवचंद शेंडे , अजय कापसिकर , अखिलेश मेश्राम ,पवन कुंभलकर , प्रवीण सोनेकर , कोमल शेंडे , नितिन कराडे , विनोद पात्रे, बबलु शेंडे,  धीरेंद्र खडसे आदिनी परिश्रम घेतले


Post a Comment

Previous Post Next Post