राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा | rashtra neta te rashtrapitha antragta pradhan mantri yancha wadhadiwas sajhara |

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

 राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा | rashtra neta te rashtrapitha antragta pradhan mantri yancha wadhadiwas sajhara |

वर्धा:- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत दहेगाव रेल्वे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी सेवाग्राम मंडळ ग्रामपंचायत दहेगाव स्टेशन तसेचदत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स,आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विदमाने ग्रामपंचायत दहेगाव स्टेशन येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये,मेडिसिन (ताप,सर्दी, खोखला, बिपी, शुगर), नेत्रविभाग (डोळ्यांची तपासणी, मोतियाबिंदु ), दंतविभाग (दाताला किड लागने, दात हालने, मुखरोग),फिजिओथेरपी (मालिश करने, व्यायाम,मानेचे दुखणे, कंबरदुखी) इत्यादी तपासणी करण्यात आल्या.

त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित श्री. नंदूभाऊ झोटिंग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सेवाग्राम मंडळ सौ. राजश्रीताई गावंडे सरपंच ग्रामपंचायत दहेगाव स्टेशन श्री.गजूभाऊ दुतारे, श्री.गौरवजी गावंडे,श्री.सुरेशभाऊ तुमडाम, श्री.आशिषभाऊ गावंडे,शिवम चिखलकर अथर्व गावंडे, आकाश बावणे, समीर गावंडे, सतीश घाटे, पांडुरंगजी चिखलकार,साहिल खोब्रागडे, निखिल गायकवाड हे उपस्थित होते.तसेच या शिबिरात मेडिसिन स्पेशलिस्ट डॉक्टर रिया गमने मॅडम व डॉक्टर गौरव येळने व फिजिओथेरपी स्पेशलिस्ट डॉक्टर आदिती नगोरे मॅडम तसेच नेत्ररोग डॉक्टर युग पवार मॅडम

दंत विभाग डॉक्टर निकिता सोनी मॅडम नर्सिंग स्टाफ शुभलाल जोशी, प्रतिभा भानशे. धम्मशिला बिले, सोशल वर्कर, सुनील रहाटे अटेंडंट, गणेश गोडे यांच्या उपस्थितीत या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते तपासणी केलेल्या 15 रुग्णांना सावंगी आचार्य विनोबा भावे रुग्णाला पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा | rashtra neta te rashtrapitha antragta pradhan mantri yancha wadhadiwas sajhara |

आझाद भारत न्यूज 24 विदर्भ चीप ब्युरो संतोष देशमुख वर्धा

Post a Comment

Previous Post Next Post