नाना पटोले विधानसभेत मांग-गारुडी समाजाच्या समस्यावर मुद्दा उचलणार | nana patole vidhansabhet mang-garodi samajachya samasyacha mudda uchalnaar |


नाना पटोले विधानसभेत मांग गारुडी समाजाच्या समस्यावर मुद्दा उचलणार

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत पटोलेंना मांग गारुडी समाज युवक संघ चे निवेदन

मांग गारुडी समाजाच्या विविध समस्यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांना मांग गारुडी समाजांनी आपल्या समस्या सांगितल्या, त्यावर नानाभाऊ पटोले यांनी समाजाच्या समस्या विधानसभेत मांडणार व निराकरण होई पर्यंत संघर्ष करणार असे आश्वासन दिले.

मांग गारुडी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये समाजाच्या विमुक्तांकरिता घटनात्मक व कायमस्वरूपी आयोग स्थापन करून मांग गारुडी समाजाच्या विमुक्त लोकांना संपूर्ण देशात एस.सी. च्या वर्गवारी सामील करण्यात यावे, मांग गारुडी समाजाचे पुनर्वसन होण्यासाठी व विकास होण्यासाठी जिल्हानिहाय सामाजिक भूमीची मागणी केली,

राज्यस्तरावर मांगारोडी समाजासाठी विशेष संशोधन समिती निर्माण करण्यासाठी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावर मांग गारोडी समाजाचे प्रतिनिधी नेमण्याची तसेच मांग गारुडी समाजाच्या उन्नतीसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे वार्षिक वित्त 500 कोटी करण्याची ही मागणी केली,

मांग गारुडी समाजाच्या जमातीत विशेष घटक योजना राबवून जमिनीचे पट्टे,व घरकुल, देऊन पुनर्वसन करण्यात यावे



महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यावर, कमिट्यावर तथा बोर्डावर मांग गारुडी जमातीच्या लोकांना नेमण्याची ही मागणी केली ज्यामुळे मांग गारुडी समाज स्वाभिमानाचे जीवन जगेल, पार्टीतर्फे मांग गारुडी समाजाच्या लोकांसाठी सामाजिक विशेष प्रशिक्षण उपक्रम चालवून मांगारोडी जमातीच्या लोकवस्त्यांमध्ये निवासी शाळा व सरकार मान्यता प्राप्त सीबीएससी पॅटर्न शाळांची मागणी यावेळी केली,

मांग गारुडी समाजाला घर जमीन पाणी स्मशानभूमी देऊन त्यांच्या प्रादेशिक हक्काची समस्या सांगून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घटनात्मक संरक्षण मिळणे, पण पंचवार्षिक योजनेमध्ये मांग गारुडी विमुक्त ना स्वतंत्र बजेट व विकासाची वेगळी उपाययोजना निर्माण करण्यासाठी मांग गारोडी समाजाचा शैक्षणिक विकासासाठी लहुजी साळवे अभ्यास आयोगात मांग गारुडी समाजाचे प्रतिनिधी व मार्गदर्शक सल्लागार समिती गठीत करून मांग गारुडी समाजाचा पुन्हा अभ्यास करण्यात यावा जेणेकरून आयोगात मान गारुडी समाजाचा पुरेपूर अभ्यास होईल अशा विविध मागण्यांचे निवेदन मांग गारुडी समाजाचे नेते व मांग गारुडी समाज युवक संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष शक्ती पात्रे यांच्याद्वारे केले.

यावेळी शिष्टमंडळात उमेश गायकवाड, अमर पात्रे, रिदम शेंडे, विजय गायकवाड, विशाल शेंडे, नाना पात्रे, अर्जुन गायकवाड, शहानंद शेंडे, नितीन गायकवाड, शिवम पात्रे, अजय गायकवाड, आदित्य पात्रे, रवींद्र गायकवाड, किरण लोंढे, लालकार गायकवाड, सोनू गायकवाड, चंदन गायकवाड, कमलेश पात्रे इत्यादी उपस्थित होते.

नाना पटोले विधानसभेत मांग-गारुडी समाजाच्या समस्यावर मुद्दा उचलणार | nana patole vidhansabhet mang-garodi samajachya samasyacha mudda uchalnaar |

आजाद भारत न्यूज24 साठी रिजवान आजमी-कामठी कन्हान

Post a Comment

Previous Post Next Post