वर्धा गिरोली येथील खून प्रकरणी तीन आरोपी देवळी पोलिसांच्या ताब्यात | wardha giroli khun prakarni | tin aropi police tabyat|

वर्धा गिरोली येथील खून प्रकरणी तीन आरोपी देवळी पोलिसांच्या ताब्यात

रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने जप्त.!

देवळी /वर्धा:-  देवळी तालुक्यातील गिरोली येथे शुक्रवार च्या मध्य रात्री दरम्यान अरुन किसन डहाके वय अंदाजे ६० वर्ष यांच्या घरी चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांनी पंलगावर झोपून असलेला अरून किसन डहाके याला पावशी मारून झोपेतच ठार केले असल्याची घटना गिरोली गावात घडली.

या प्रकरणातील तीन आरोपींना देवळी पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये दोन सहकार्यासह मुलीचा मुलगा नातूच..! आरोपी निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेच्या दिवशी मृतक अरुण डहाके हे आपल्या मुलीकडे राखी निमित्ताने वर्धा येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत आरोपी अल्पवयीन नातू व सहकार्याने चोरी करण्याचा बेत रचला व चोरी करण्यास गिरोली येथे आले असता आजोबा त्यांना घरी झोपल्याचे दिसले, अल्पवयीन नातू व त्याचे सहकारी चोरी करत असताना मृतकाला जाग आली आपले बिंग फुटू नये याच उद्देशाने बाजूला ठेवून असलेल्या पावशीने मानेवरती व डोक्यावरती सपासप वार करून मृतक अरून डहाके ला जीवानाशी ठार केले.

 

यातील मुख्य आरोपी अल्पवयीन नातूचा सहकारी मयूर गजानन कोडापे वय वर्ष १८ व हर्षल दिलीप पारटकर वय वर्ष १८ रा. दोघेही वर्धा असून हे मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पीदुरकर  हे करीत आहे.

वर्धा गिरोली येथील खून प्रकरणी तीन आरोपी देवळी पोलिसांच्या ताब्यात | wardha giroli khun prakarni | tin aropi police tabyat|

आझाद भारत न्यूज24 विदर्भ चीफ संतोष देशमुख वर्धा

Post a Comment

Previous Post Next Post