वर्धा उपअधीक्षक भूमिलेख देवळीचे अधिकारी यांनी सीमांकन करण्यासाठी काढल्या त्रुट्या | wardha upadhikshak bhumiabhilekh dewaliche adhikari | yanni simankan karnyasathi kadhnysathi trutya |


वर्धा उपअधीक्षक भूमिलेख देवळीचे अधिकारी यांनी सीमांकन करण्यासाठी काढल्या त्रुट्या

वर्धा:-  वर्धा उपअधीक्षक भूमिलेख देवळी चे अधिकारी सुखदेव खोंडे यांनी सीमांकन करण्यासाठी काढल्या त्रुट्या ! नाचणगाव शिवाजी कॉलनी मासे लेआउट वार्ड क्रमांक चार येतील आठ ते दहा लोकांनी वीस फुटाच्या रस्त्यावरील अतिक्रमण करून ठेवलेले आहे.

 वारंवार नाचणगाव ग्रामपंचायत मधील तक्रार स्थानिक लोकांनी केली असता, नाचणगाव ग्रामपंचायत ने भुमीलेख देवळी यांच्याकडे मोजणी करण्यासाठी व रस्ता कुठे आहे यासाठी भुमीलेख देवळी यांच्याकडे, सीमांकन करण्यासाठी मागणी केली व पैशाचा भरणा सुद्धा केला होता.



भुमीलेख यांनी मोजणी केली व वीस फुटाच्या रस्त्याचं सीमांकन करण्यासाठी उपअधीक्षक सुखदेव खांडे यांनी त्रुट्या काढून अंतिम अर्ज निकाली काढून लावलेला आहे.

उपअधीक्षक देवळी सुखदेव खांडे हे नेहमीच त्रुट्या काढून अर्ज निकाली लावून ठेवतात या अगोदरही सेलू मध्ये असंच प्रकरण घडलेलं आहे. नेमकं बघता भुमी लेख ऑफिसमध्ये पैशाचा भरणा करून, रस्ता नेमके कुठून आहे! याचं मोजमापन करून देणे हे भूमीलेख कार्यालयचे कर्तव्य आहे.

 त्याच्या त्रुट्या काढून अर्ज निकाली काढून ठेवणे हे कितपत चांगला आहे आता नाचणगाव ग्रामपंचायत चे सचिव व सरपंच यांची काय भूमिका असणार आहे असे शिवाजी कॉलनीतल्या लोकांचे लक्ष लागलेले आहे. 

वर्धा उपअधीक्षक भूमिलेख देवळीचे अधिकारी यांनी सीमांकन करण्यासाठी काढल्या त्रुट्या | wardha upadhikshak bhumiabhilekh dewaliche adhikari | yanni simankan karnyasathi  kadhnysathi trutya |                          

आझाद भारत न्यूज 24ची ब्युरो...! संतोष देशमुख वर्धा

Post a Comment

Previous Post Next Post